Best Marathi Poem on Rakshabandhan, Marathi Poetry | मराठी रक्षाबंधन कविता

Rakshabandhan is a popular hindu’s traditional festival celebrated in India. On this day, sisters of all ages tie the rakhi, around the wrists of their brothers, symbolically protecting them and receiving a gift in return. In below you get an amazing Marathi Rakshabandhan Quotes, Status and SMS. I hope you like our Best Marathi Rakshabandhan Quotes, Status and SMS and share with your friends. रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या निखळ आणि पवित्र नात्याचे प्रतीक आहे. या कवितेमध्ये मी बहीण भावाचे प्रेमळ नाते कसे असते हे मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…

माझी ताई – Best Marathi Poem on Rakshabandhan | मराठी रक्षाबंधन कविता

आईसारखी तू
आईची छाया होती
भोळीभाबडी तुझ्या
प्रेमाची माया होती

प्रत्येक वळणावर जीवनाच्या
तू नेहमी उभी राहिलीस
माझ्यासाठी सदैव
किती काळजी वाहिलीस

शब्दामध्ये कसे सांगू
आपल्या नात्याचा उबदारपणा
तुझ्यासाठी हृदयात राखून
ठेवलाय मी एक कोना

राखी पुनवेला जेव्हा तू
डोळ्यात तेल टाकून वाट बघायची
मला यायला नाही जमलं
तर आपसूकच रडायची

लहानपणी आरतीत टाकलेला एक रुपया ही
जेव्हा तुला लाखासारखा वाटायचा
तुझ्या डोळ्यातलं प्रेम बघून
उर माझा दाटायचं

ती माया, ते प्रेम आजही
तुझ्या डोळ्यात दिसतं
एवढंच कि ह्या धावपळीमुळे
फक्त तुझ्या शब्दात नसतं

तू सदैव आनंदात राहावं
हेच मला सांगायचं आहे
जन्मो जन्मी तूच बहीण असावी
हेच मला देवाकडे मागायचं

– केशव कुंभार


You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *