Inspirational Marathi Poem on Love, Marathi Poetry, Love Poem in Marathi | मराठी प्रेम कविता

Love is Uncondtional. Love is a strong feeling of affection, affection and intimate love. Knowing the mind is the feeling of love ….. !! In below you get an amazing Inspirational Marathi Poem on Love for your loved once. I hope you like our Inspirational Marathi Poem on Love and share with your friends. प्रेम ही एक भावना आहे. या कवितांमध्ये मी प्रेमाच्या भावना मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…

निस्वार्थी प्रेम – Marathi Poem about Love | मराठी प्रेम कविता

एखाद्या व्यक्तीच्या नकळत
तिच्यावर जीवापाड प्रेम करणे
रोज अगदी न चुकता
लपून लपून तिची एक झलक पाहणे…

तिने एकदा तरी आपल्याला पहावे
म्हणून सतत तिच्या मागे पुढे घुटमळणे
अन् तिचे आपल्याकडे लक्ष नाही
हे बघून अधिकच उदास होणे…

प्रेम म्हणजे नक्की काय असते
हे फक्त तिला पाहूनच कळणे
कोणतीही अपेक्षा न  करता
फक्त तिलाच न्याहाळणे…

रात्रंदिवस जणू मनावर
फक्त तीचेच वर्चस्व असणे
अन् स्वतःला विसरून
चोहीकडे फक्त तीच दिसणे…

प्रेमाची परीभाषा काय असते
हे प्रेमात पडल्यावरच कळते
अन् शब्दांत मांडता न येणारे
हेच तर खरे प्रेम असते…

प्रेम म्हणजे तिला मिळवणे नसतं
प्रेम म्हणजे तिला खुलवणे असतं
अन् तिच्या प्रत्येक हालचालींना
निरागसपणे डोळ्यांत साठवणे असतं…

प्रेमाचे नाते हे जन्मोजन्मीचे
जेथे कोणतेही बंधन नसते
मात्र दोघांच्याही सुखदुःखात
आयुष्यभर दिलेली साथ असते…

प्रेमात पाहिलेली प्रत्येक स्वप्ने
ही दोघांचेही असतात
एकाने पहावे अन् दुसऱ्याने
ते पूर्ण करावे असे म्हणतात…

जो प्रेमाच्या या अथांग
सागरात आनंदाने बुडाला
त्यालाच खऱ्या अर्थाने या
निस्वार्थी प्रेमाचा अर्थ कळाला…

त्यालाच खऱ्या अर्थाने या
निस्वार्थी प्रेमाचा अर्थ कळाला…

 -प्रियांका कुंभार


थांबशील का माझ्यासाठी – Marathi Poem about Love | मराठी प्रेम कविता

थांबशील का माझ्यासाठी त्या पैलतीरी
जिथे आपली पहिली भेट झाली…
वाट पाहशील का माझ्या येण्याची
जिथे पहिल्या प्रेमाला सुरुवात झाली…

थांबशील का माझ्यासाठी त्या नदीतीरी
जिथे आपण तासंतास एकत्र राहिलो…
भविष्यातील आपल्या नव्या संसाराच्या
आनंदीमय सुंदर स्वप्नात बुडालो…

थांबशील का माझ्यासाठी सांग सख्या
नव्याने जन्म घेऊन येईल पुन्हा…
प्रेमाच्या क्षणांचा वर्षाव करुनी
सुखात ठेवीन सदा तुला…

 -प्रियांका कुंभार


Read more poems – Click Here

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *