Marathi Love Quotes, Status, Shayari and SMS | मराठी प्रेम संदेश

Love is a strong feeling of affection, affection and intimate love. Knowing the mind is the feeling of love ….. !! In below you get an amazing Marathi Love Quotes, Status, Shayari and SMS for your loved once. I hope you like our Marathi Love Quotes, Status, Shayari and SMS and share with your friends. प्रेम ही एक भावना आहे. या पोस्टमध्ये मी प्रेमाच्या भावना मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…

काही क्षण – Marathi Quotes on Love | मराठी प्रेम संदेश

काही क्षण इथेच माझ्या जवळी रहा
आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलवत रहा
प्रेमाच्या शब्दसुमनांनी खुलवत रहा
काही क्षण असाच सख्या जवळी रहा


तुझा रुसवा – Marathi Quotes on Love | मराठी प्रेम संदेश

गोड अबोल हा तुझा रुसवा

जणू वेड लावे माझ्या जीवा

क्षणांत हसरा क्षणांचा रागवा

प्रेमाने भरलेला अल्लड गोडवा


तुझ्यासाठी – Marathi Quotes on Love | मराठी प्रेम संदेश

तुझ्यासाठी तुझ्यापासून
दूर मी गेली …
तुझ्या आनंदासाठी
एकटी मी झाली …


हा पाऊस – Marathi Quotes on Love | मराठी प्रेम संदेश

मनात असंख्य वादळ
घेऊन येणार हा पाऊस
आठवणींमध्ये चिंब
भिजवणारा हा पाऊस …


अंतःकरण – Marathi Quotes on Love | मराठी प्रेम संदेश

अंतःकरणास भेदून जातील
असे हे तुझे कठोर शब्द…
मनाचे असंख्य तुकडे करून
मला अगदी निशब्द करतात…


तुझीच आस – Marathi Quotes on Love | मराठी प्रेम संदेश

ये मोहना लवकरी
दाव मला वाट तुझी
चित्ती तुझाच ध्यास
लागली तुझीच आस


प्रेमा तुझी नावे किती – Marathi Quotes on Love | मराठी प्रेम संदेश

प्रेमा तुझी नावे किती
शब्द सुचेना व्याख्या अशी
अगणित भावना जडल्या मनी
अव्यक्त प्रेम व्यक्त करू मी कशी


तुझे अन् माझे प्रेम – Marathi Quotes on Love | मराठी प्रेम संदेश

प्रेमाचे वर्णन करू तरी कसे
जणू सप्तसुरांतील सात सूर भासे
व्यक्त न करण्याजोगे सख्या
तुझे अन् माझे प्रेम हे असे


All Quotes Written by Priyanka Kumbhar

Check out more Quotes – Click Here

You may also like...

2 Responses

  1. Swapnil Mandlekar says:

    Nice poem 😍😍💟

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *