Inspirational Marathi Poem on Life, Marathi Poetry,Life Poem in Marathi | मराठी जीवन कविता

Life is precious so we have to make it happy. I hope you like our Inspirational Marathi Poems on Life and share with your friends. या कवितांमध्ये मी आयुष्यात आलेले अनुभव मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…

मनाचा आवाज – Inspirational Marathi Poem on Life | मराठी जीवन कविता

सगळे दुःख तूच भोगणार
लोकांचेही तूच ऐकणार
अगं नारी कधी तू तुझ्या
मनाचा आवाज ऐकणार

तू सगळ्यांचा विचार करणार
त्रास मात्र स्वतःच सहन करणार
अगं नारी कधी तू तुझ्या
मनाचा आवाज ऐकणार

तू सगळ्यांची मनं जपणार
सगळे मात्र तुझं मन दुखावणार
अगं नारी कधी तू तुझ्या
मनाचा आवाज ऐकणार

उठ आता आणि कर निर्धार
स्वतःसाठी काही क्षण मी जगणार
परिवर्तनाचा वसा घेऊनी
सदैव मनाचा आवाज मी ऐकणार

-प्रियांका कुंभार


आज पुन्हा लहानपण जगायचंय – Inspirational Marathi Poem on Life | मराठी जीवन कविता

आयुष्याच्या शर्यतीत कुठेतरी थांबायचंय
आज पुन्हा लहानपण जगायचंय…

लहान बाळ होउन आईच्या कुशीत लोळायचंय
आज पुन्हा लहानपण जगायचंय…

इवल्या इवल्याशा पावलांनी शाळेत जायचंय
आज पुन्हा लहानपण जगायचंय…

फुलपाखरू होउन मुक्तपणे फिरायचंय
आज पुन्हा लहानपण जगायचंय…

सुखाचा मोह सोडून स्वच्छंदी बागडायचंय
आज पुन्हा लहानपण जगायचंय…

मला पुन्हा एकदा लहान व्हायचंय
आज पुन्हा लहानपण जगायचंय…

आज पुन्हा लहानपण जगायचंय…

        -प्रियांका कुंभार.


Read more poems – Click Here

You may also like...

2 Responses

  1. Swapnil Mandlekar says:

    Very Nice poem it is!! 😍💟

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *