Best Happy Friendship Day Quotes in Marathi, Status, Wishes, Message, SMS, Shayari, Images | मराठी मैत्री दिनाच्या शुभेच्छा संदेश

Happy Friendship Day to Everyone. Friendship is a relationship which is depend upon trust and mutual understanding. It is a stronger relationship between people. In below you get an amazing Happy Friendship Day Quotes in Marathi, Status, Shayari and SMS for your loved once. I hope you like our Happy Friendship Day Quotes in Marathi, Status, Shayari and SMS and share with your friends. मैत्री एक विश्वासाचं नातं आहे. एकमेकांचा आधार आहे. मराठी मैत्री दिनाच्या शुभेच्छा संदेश या पोस्टमध्ये मी मैत्रीच्या भावना मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…

आयुष्याच्या वळणावर – Marathi Quotes on Friendship Day | मराठी मैत्री दिनाच्या शुभेच्छा संदेश

आयुष्याच्या वळणावर
वाटेतील प्रत्येक टप्प्यावर
महत्वाची भूमिका बजावणाऱ्या
माझ्या सर्व मित्र परिवारांना
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


जिवलग सखेसोबती – Marathi Quotes on Friendship Day | मराठी मैत्री दिनाच्या शुभेच्छा संदेश

रक्ताचे नाते नसतानाही
मनात घर करणारे
मित्र म्हणून हक्काने
योग्य मार्ग दाखवणारे
माझे जिवलग सखेसोबती
मैत्री दिवसाच्या खूप शुभेच्छा !!!


निखळ मैत्री – Marathi Quotes on Friendship Day | मराठी मैत्री दिनाच्या शुभेच्छा संदेश

मैत्री ही निखळ पाण्याचा झरा असते
आयुष्याच्या प्रवाहासोबत सदैव वाहते
आनंदात झुळझुळणाऱ्या पाण्यासारखी
शांत आणि निर्मळ असते
तर दुःखात प्रलयाचा स्वरूप घेते


आस तुझ्या मैत्रीची – Marathi Quotes on Friendship Day | मराठी मैत्री दिनाच्या शुभेच्छा संदेश

नदीला आस असते पाण्याची
डोळ्यांना आस असते अश्रूंची
हृदयाला आस असते ठोक्यांची
आपल्या नात्याला आस तुझ्या मैत्रीची


रेशमी बंधन – Marathi Quotes on Friendship Day | मराठी मैत्री दिनाच्या शुभेच्छा संदेश

मैत्रीचे नाते असेच असते
जिथे रक्ताचे संबंध नसते
ना जात ना धर्म असते
मना – मनाने गुंफलेले
रेशमी बंधन असते


तुझ्या मैत्रीचा छंद – Marathi Quotes on Friendship Day | मराठी मैत्री दिनाच्या शुभेच्छा संदेश

आपुलकीच्या नात्यात निसर्गाचा रंग
फुलाच्या सुंगंधाप्रमाणे मैत्रीचा गंध
फुलपाखराप्रमाणे स्वछंदी बागडणं
सदैव लाभो मला तुझ्या मैत्रीचा छंद


ओळख पवित्र नात्याची – Marathi Quotes on Friendship Day | मराठी मैत्री दिनाच्या शुभेच्छा संदेश

चंद्राला साथ चांदण्याची
धरतीला साथ गगनाची
अन् मला लाभलेली साथ
तुमच्या सारख्या मित्रांची
जणू ओळख पवित्र नात्याची


मैत्रीचे नाते – Marathi Quotes on Friendship Day | मराठी मैत्री दिनाच्या शुभेच्छा संदेश

मैत्रीचे नाते असेही असते
जिथे भावनांचा आदर असतो
नितळ आणि निर्मळ प्रेमाशिवाय
अपेक्षांचा कधीच खेळ नसतो


मैत्री ही अथांग असावी – Marathi Quotes on Friendship Day | मराठी मैत्री दिनाच्या शुभेच्छा संदेश

सागराच्या पाण्याप्रमाणे
मैत्री ही अथांग असावी
मैत्रीच्या त्या महासागरात
प्रेमाची भरती असावी


प्रेम आणि विश्वास – Marathi Quotes on Friendship Day | मराठी मैत्री दिनाच्या शुभेच्छा संदेश

मैत्री म्हणजे एक
निखळ आरसा असतो
प्रेम आणि विश्वासाचा
वारसा असतो


All Quotes Written by Priyanka Kumbhar

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *