Best Marathi Rakshabandhan Quotes, Status and SMS | मराठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

Rakshabandhan is a popular hindu’s traditional festival celebrated in India. On this day, sisters of all ages tie the rakhi, around the wrists of their brothers, symbolically protecting them and receiving a gift in return. In below you get an amazing Marathi Rakshabandhan Quotes, Status and SMS. I hope you like our Best Marathi Rakshabandhan Quotes, Status and SMS and share with your friends. रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या निखळ आणि पवित्र नात्याचे प्रतीक आहे. या पोस्टमध्ये मी बहीण भावाचे प्रेमळ नाते कसे असते हे मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…

आतुरता लाडक्या सणाची – Rakshabandhan Quotes in Marathi| मराठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

आतुरता लाडक्या सणाची
हाती आरती सजवली सौख्याची
सोबतीस राखी रक्षाबंधनाची
वर्षानुवर्षांची परंपरा जपण्याची


राखी पवित्र बंधनाची – Rakshabandhan Quotes in Marathi| मराठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

राखी ही पवित्र बंधनाची
बांधिते आज भाऊरायाच्या हाती
जपवणूक ही अनमोल नात्याची
सदैव फुलुदे अशीच प्रीती


रक्षाबंधनाचा सण – Rakshabandhan Quotes in Marathi| मराठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

हसत नाचत श्रावण आला
सोबतीस सुखाच्या सरी ही आल्या
आनंदाला कोणाच्या ना पार उरला
रक्षाबंधनाचा सण हा आला


राखी एक प्रतीक – Rakshabandhan Quotes in Marathi| मराठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

राखी एक प्रतीक पवित्र नात्याचे
बहीण – भावाच्या अपार प्रेमाचे


ओवाळणी रक्षाबंधनाची – Rakshabandhan Quotes in Marathi| मराठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

तुझ्या रूपाने मला मिळाली
ओवाळणी रक्षाबंधनाची
शोभते मनगटावर राखी
आपुल्या निखळ नात्याची


आनंदाच्या सरी – Rakshabandhan Quotes in Marathi| मराठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

आनंदाच्या सरी माझ्या अंगणी बरसू दे
माझ्या भाऊरायाच्या जीवनी यश येऊ दे
नात्यांतील गोडवा हा अखंड बहरूदे
रक्षाबंधनाचे हे बंध सदैव असेच टिकू दे…


नाते गुंफले – Rakshabandhan Quotes in Marathi| मराठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

नाते गुंफले हे रेशमी धाग्याने
वास्तल्य आपुलकी अन् जिव्हाळ्याने
सदैव टिकावे हे बंध नात्याचे
बहीण – भावाच्या निर्मळ प्रेमाचे


कपाळी कुंकुवाचा टिळा – Rakshabandhan Quotes in Marathi| मराठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

कपाळी कुंकुवाचा टिळा
हाती राखी शोभे सदा
मुखी तुझ्या गोड हास्य
अनंतकाळ खुलू दे सदा


माझा भाऊराया – Rakshabandhan Quotes in Marathi| मराठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

वडिलतुल्य माझा भाऊराया
घेऊनि आला प्रेमाचा घडा
नशीबवान ही बहीण तयाची
वृद्धिंगत होवो हे नाते सदा


वचन – Rakshabandhan Quotes in Marathi| मराठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

भाळी यशाचा टिळा लावून
औक्षण करते मी भाऊराया
हाती प्रेमाची राखी बांधून
वचन देते ही बहीण तुला
रक्षणार्थ मी सदैव आहे
खंबीरपणे पाठीशी तुझ्या


बहिणाबाई – Rakshabandhan Quotes in Marathi| मराठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

आईसमान बहिणाबाई
वात्सल्य अन् ममतेची मूर्ती
राखीच्या सुंदर बंधनात
कायम होउ दे प्रेमाची पूर्ती


All Quotes Written by Priyanka Kumbhar

Read More Quotes – Click Here

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *