Best Marathi Love Poems, Love Poems in Marathi, Love Poetry | प्रेम कविता

Love is a strong feeling of affection, affection and intimate love. Knowing the mind is the feeling of love ….. !! In below you get an amazing marathi love poems for your loved once. I hope you like our Marathi poem and share with your friends. प्रेम ही एक भावना आहे. या कवितांमध्ये मी प्रेमाच्या भावना मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…

भास – Romantic Love Poem in Marathi | प्रेम कविता

या मुसळधार पावसात
अवचित तुझे येणे
तुझा तो अल्लडपणा
माझ्या मना मोहून जाणे

अन् वारा तो ही बेधुंद वाहे
जणू गातो गीत प्रेमाचे
तुझ्या त्या कोमल स्पर्शाने
विसरून गेली भान जगाचे

मग येऊन भानावर
माझेच मला उमलते
अवचित तुझे असे येणे
हा भास आहे हे कळते

अवचित तुझे असे येणे
हा भास आहे हे कळते

-प्रियांका कुंभार

best marathi poem

भेट – Marathi Love Poem about First Meeting | प्रेम कविता

दोन  अनोळखी जीव
असेच एकदा नकळत भेटले
नजरेस नजर भिडली
अन् एकमेकांत हरवले

बघताच क्षणी तिला
विसरून गेला तो स्वतःला
मनी वाटले त्याला
स्वर्गच जणू मिळाला

चुकवून नजर त्याची
क्षणात माघारी ती फिरली
मनोमनी त्यालाच आठवून
पुन्हा मागे वळून ती हसली

तिची ती सुंदर आक्रुती
हळूहळू दिसेनाशी झाली
अन् त्याच्या डोळ्यांना मात्र
तिचीच ओढ लागली

तिला पुन्हा पाहण्यासाठी
तो फार बैचेन झाला
तिला जाणून घ्यायला
तो खूप आतुर झाला

मग पुन्हा तिच्या भेटीसाठी
तो रोज तेथे येऊ लागला
ती पुन्हा येईल येथे
आशेने तो शोधू लागला

तिला भेटण्याची इच्छा
त्याच्या मनी तीव्र झाली
पण तिला या सगळ्याची
कधी चाहूल नाही लागली

हळूहळू असाच त्याचा
नित्यक्रम होत गेला
तिला भेटण्याची इच्छा बाळगून
तो निराश घरी परतला

-प्रियांका कुंभार


अव्यक्त भावना – Marathi Love Poem about Feelings | प्रेम कविता

अव्यक्त भावना व्यक्त करू मी कशी
सांग सख्या तुझ्याविना जगू मी कशी

काळ ही लोटला वेळ ही सरली
हाती फक्त तुझी आठवण उरली
उरलेल्या आठवणींत मन लावू कशी
सांग सख्या तुझ्याविना जगू मी कशी

तुझ्याविना क्षणभरही मन रमत नाही
जीवलगा आता मात्र जगणे शक्य नाही
गेलास मला सोडून एकटी राहू मी कशी
सांग सख्या तुझ्याविना जगू मी कशी

अव्यक्त भावना व्यक्त करू मी कशी
सांग सख्या तुझ्याविना जगू मी कशी

-प्रियांका कुंभार


Read more poems – Click Here

You may also like...

2 Responses

  1. Swapnil Mandlekar says:

    You are Great poet!! 😍😍💟💗

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *